झेब्रॉनिक्सचे व्हॉईस असिस्टंटयुक्त इयरफोन्स

0

ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त नाव असणार्‍या झेब्रॉनिक्सने आता व्हाईस असिस्टंटयुक्त झेब-पीस हे वायरलेस इयरफोन्स बाजारपेठेत उतारले आहेत.

डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट आता स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमध्ये वापरले जात आहेत. यात स्मार्टफोनसह स्मार्ट स्पीकर, हेडफोन्स आदी उपकरणांचा समावेश आहे. या अनुषंगाने झेब्रॉनिक्सने आता याच प्रकारातील असिस्टंटने सज्ज असणारा झेब-पीस हा इयरफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. कुणीही इयरफोनवर क्लिक करून या फिचरचा उपयोग करू शकतो. याच्या मदतीने व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. यात म्युझिकचा ट्रॅक बदलणे, आवाज कमी-जास्त करणे आदींसह संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे अथवा कॉल रिसिव्ह करण्याचा समावेश आहे. यातील बॅटरी एकदाच चार्ज केल्यानंतर सुमारे अडीच तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. तर यासोबत चार्जींग करणारी केससुध्दा उपलब्ध करण्यात आली असून यातून अतिरिक्त सहा तासांचा बॅकअप मिळू शकतो.

झेब-पीस हे मॉडेल आकाराने अतिशय आटोपशीर असून याच्या प्रत्येक इयरपॉडचे वजन फक्त ४ ग्रॅम इतके आहे. यामुळे ते वापरण्यासाठी अतिशय सुलभ असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या मदतीने कुणीही सुश्राव्य संगीताचा आनंद घेऊ शकणार आहे. याला स्मार्टफोन अ‍ॅपशी संलग्न करता येणार असून हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य ३,९९९ रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

पहा:- झेब्रॉनिक्सच्या पीस या मॉडेलची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here