युट्युबच्या युजर्सला मिळणार ऑटो प्ले ऑन होम फिचर

0

युट्युबच्या युजर्सला आता ऑटो प्ले ऑन होम हे फिचर प्रदान करण्यात आले असून अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला उपलब्ध करण्यात येत आहे.

युट्युबच्या युजर्सला अलीकडेच स्टोरीज हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजरला स्टोरीजचा वापर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या पाठोपाठ आता ऑटो प्ले ऑन होम या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत स्मार्टफोनवरून युट्युबचा वापर करणार्‍या युजरच्या होमपेजवर कोणताही व्हिडीओ ऑटो प्ले होणार आहे. अर्थात हा पूर्णपणे प्ले होणार नसून याचा फक्त प्रिव्ह्यू युजरला दिसणार आहे. काही सेकंदाच्या या प्रिव्ह्यूमुळे त्या व्हिडीओतील कंटेंटची माहिती त्या युजरला मिळणार आहे. आधी युट्युबच्या प्रिमीयम अकाऊंटधारकांना ही सुविधा देण्यात आली होती. आता मोफत अकाऊंट वापरणार्‍यांनाही हे फिचर देण्यात येत आहे. या प्रिव्ह्यूमध्ये ध्वनी नसून याऐवजी कंटेंटची माहिती देणार्‍या उपशीर्षकांचा (सबटायटल्सचा) समावेश असणार आहे.

इन्स्टाग्रामच्या स्क्रोलेबल इंटरफेसवर या प्रकारचे फिचर आधीच देण्यात आलेले आहे. यातही म्युट अवस्थेत कोणत्याही व्हिडीओचा प्रिव्ह्यू पाहता येतो. यामुळे युट्युबने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी याला सादर केल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कुणीही युजर ऑटो प्ले या फिचरला ऑफदेखील करू शकतो. यासाठी त्याला सेटींगमधून जाऊन ऑटो प्लेचा पर्याय ऑफ करावा लागणार आहे. याशिवाय, कुणीही युजर याला फक्त वाय-फाय सुरू असतांना वापरण्याचा पर्यायदेखील निवडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here