शाओमीच्या ‘या’ स्मार्टफोनच्या मूल्यात झालीय कपात !

0
शाओमी मी ए२, मी ए२ लाईट, xiaomi mi a2, mi a2 lite

शाओमी कंपनीने आपल्या मी ए२ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात कायमस्वरूपी कपात करण्याचे जाहीर केले आहे.

गत ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात मी ए२ हा स्मार्टफोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम या दोन पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला होता. यातील ४ जीबी रॅमचे व्हेरियंट १६,९९९ रूपये मूल्यात तर ६ जीबी रॅमचे व्हेरियंट १९,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले होते. यानंतर मध्यंतरी याच्या दोन्ही व्हेरियंट एक हजार रूपयांनी स्वस्त झाले होते. आता यामध्ये पुन्हा दोन हजार रूपयांची कायमस्वरूपी कपात करण्यात आलेली आहे. यामुळे आता ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट १३,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य तीन हजारांनी घटविण्यात आले आहे. यामुळे याला आता १५,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे.

शाओमी मी ए२ या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६० हा प्रोसेसर असेल. वर नमूद केल्यानुसार याला ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पयार्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन्ही व्हेरियंटचे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे दोन्ही मॉडेल्स ब्ल्यू, ब्लॅक आणि गोल्ड अशा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. मी ए२ या मॉडेलच्या मागील बाजूस २० आणि १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यात २० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच यामध्ये क्विकचार्ज ३.० प्रणालीचा सपोर्ट असणारी ३,०१० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here