शाओमीचा स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन

0

शाओमीने रेडमी गो हा स्मार्टफोन अवघ्या ४४४९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमी १० मार्च रोजी रेडमी गो हे मॉडेल लाँच करणार असल्याची माहिती आधीच जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने आज हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य फक्त ४४९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट, मी.कॉम आणि मी स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ब्ल्यू आणि ब्लॅक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासोबत जिओने २२०० रूपयांचा कॅशबॅक जाहीर केला असून यासोबत १०० जीबी डाटा मोफत मिळणार आहे.

रेडमी गो हा अँड्रॉइड गो ( ओरियो एडिशन) या आवृत्तीवर चालणारा आहे. ही आवृत्ती खास करून कमी रॅम व स्टोअरेजच्या स्मार्टफोनसाठी विकसित करण्यात आलेली आहे. या आवृत्तीवर चालणारा हा शाओमीचा पहिलाच स्मार्टफोन असल्याची बाब लक्षणीय आहे. शाओमीच्या रेडमी गो या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ८ तर समोर ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर यातील बॅटरी ३००० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here