शाओमीचा प्रदूषण रोधक मास्क सादर

0

शाओमीने भारतीय युजर्ससाठी मी एयरपॉप पीएम२.५ हा प्रदूषण रोधक मास्क सादर करण्याची घोषणा केली आहे.

शाओमीने गत काही दिवसांपासून नवीन प्रॉडक्ट लाँच करण्याचे संकेत दिले होते. याचा टिझरदेखील जारी करण्यात आला होता. या अनुषंगाने मी एयरपॉप पीएम२.५ हा मास्क भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. देशात सध्या वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. महानगरेच नव्हे तर अगदी लहान शहरे आणि गावांमध्येही याची भयावहता दिसून येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी वायू शुध्दीकरण उपकरणे (एयर प्यरिफायर्स) सादर केली आहेत. शाओमीने तर भारतात सर्वात किफायतशीर मूल्यात विविध एयर प्युरिफायर्स लाँच केले आहेत. यानंतर प्रदूषणाचा वैयक्तीक पातळीवरून प्रतिकार करण्यासाठी मी एयरपॉप पीएम२.५ हा प्रदूषण रोधक मास्क सादर करण्यात आला आहे. याचे मूल्य २४९ रूपये असून याला कंपनीच्या मी.कॉम या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहे.

मी एयरपॉप पीएम२.५ या प्रदूषण रोधक मास्कच्या मदतीने वायू प्रदूषणाला अतिशय परिणामकारकरित्या अटकाव करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या नावातच नमूद असल्यानुसार हा मास्क पीएम २.५ या हवेतील अतिशय घातक कणांना अटकाव करण्यास सक्षम आहे. यात चार विविध फिल्टरेशनच्या प्रकियेतून प्रदूषणाला कारणीभूत ठरणार्‍या घटकांना विलग करण्यात येऊन मास्क धारण करणार्‍याला अतिशय शुध्द हवेचा श्‍वास घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासाठी अतिशय दर्जेदार फॅब्रिक वापरण्यात आले असून ते युजरला सुखकारक वाटणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. हा मास्क वापरण्यासाठी सुलभ आणि आटोपशीर आकाराचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here