विंग्ज क्रोम वायरलेस इयरफोन्स दाखल

0

विंग्ज लाईफस्टाईल कंपनीने विंग्ज क्रोम हे वायरलेस इयरफोन्स भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

विंग्ज लाईफस्टाईल या भारतीय कंपनीने अलीकडेच बाजारपेठेत पदार्पण केले आहे. या कंपनीने आता विंग्ज क्रोम हे मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल इन-इयर मॉनिटर म्हणजेच आयईएम या प्रकारातील असणार आहे. तर वर नमूद केल्यानुसार यामध्ये वायरलेस कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आलेली आहे. याचे डिझाईन अतिशय आकर्षक असेच आहे. याशिवाय, हे इयरफोन्स वापरण्यास अतिशय सुलभ आणि वजनाने हलके आहेत. यामध्ये मायक्रो-वुफर देण्यात आलेले असून याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात क्वॉलकॉमची क्लिअर व्हॉईस कॅप्चर (सीव्हीसी) ६.० ही नॉईज कॅन्सलेशन प्रणाली देण्यात आलेली आहे. याच्या मदतीने बाह्य ध्वनीचा त्रास हा कमी होणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. तर यातील ११० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचेही कंपनीतर्फे नमूद करण्यात आलेले आहे. आयपीएक्स५ या मानकानुसार हे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. तसेच यात इन-लाईन या प्रकारातील मायक्रोफोन देण्यात आला असून याच्या मदतीने संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरील कॉलींग करता येणार आहे. तसेच यात रिमोट कंट्रोलदेखील दिलेला असून याच्या मदतीने ध्वनी कमी-जास्त करण्यासह कॉल करणे अथवा रिजेक्ट करण्याचे फंक्शन्सही पार पाडता येणार आहे.

विंग्ज क्रोम हे वायरलेस इयरफोन्स २,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. याला मिंत्रा आणि अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here