व्हाटसअ‍ॅपला लवकरच फिंगरप्रिंट स्कॅनरचे सुरक्षा कवच

0

व्हाटसअ‍ॅपच्या युजर्ससाठी लवकरच फिंगरप्रिंट स्कॅनरचे सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

व्हाटसअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फिचर्स देत आहे. अलीकडेच या मॅसेंजरने आपल्या बीटा आवृत्तीच्या युजर्ससाठी ३० युजर्सला एकाच वेळी ऑडिओ फाईल फॉरवर्ड करण्याची सुविधा दिलेली आहे. हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत असून याला लवकरच अन्य युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला लवकरच फिंगरप्रिंट स्कॅनींगच्या माध्यमातून बायोमॅट्रीक ऑथेंटीकेशनची सुविधा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या सर्व आगामी फिचर्सबाबत अचूक भाकिते करणार्‍या wabetainfo या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी लवकरच फिंगरप्रिंट स्कॅनींगची सुविधा मिळणार आहे. आयओएससाठी हे फिचर टच आयडी या नावाने देण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत युजर आपल्या बोटाच्या ठशाच्या मदतीने लॉगीन करू शकतो. समजा या प्रकारातील लॉगीन फेल झाले तर अन्य प्रकारातील पासवर्ड वापरण्याची सुविधादेखील यातून मिळणार आहे. हे फिचर पहिल्या टप्प्यात निवडक डेव्हलपर्ससाठी देण्यात आलेले आहे. लवकरच याला अँड्रॉइड व आयओएस प्रणालीची बीटा आवृत्ती वापरणार्‍यांना देण्यात येणार आहे. यानंतर हे फिचर सर्व युजर्सला वापरता येणार असल्याचे wabetainfo ने या वृत्तात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here