फेक अ‍ॅपच्या युजर्सच्या व्हाटसअ‍ॅप वापरावर बंदी

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या मॅसेंजरशी साधर्म्य असणार्‍या फेक अ‍ॅपचा वापर करणार्‍यांना बंदी लादण्यास प्रारंभ केला आहे.

व्हाटसअ‍ॅप हे मॅसेंजर जगात तुफान लोकप्रिय आहे. भारतात याचे तब्बल २० कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यात दररोज भर पडत आहे. व्हाटसअ‍ॅपच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्यासाठी या मॅसेंजरशी साधर्म्य सांगणारे अनेक फेक अ‍ॅप्स कार्यरत आहेत. यातील काही अ‍ॅप्स हे व्हाटसअ‍ॅपच्या फिचर्सपेक्षा थोड्या वेगळ्या सुविधादेखील देत असल्यामुळे बरेच युजर्स व्हाटसअ‍ॅपच्या सोबत याचा वापर करत असतात. मात्र आता व्हाटसअ‍ॅपने या प्रकाराबाबत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारचे बनावट अ‍ॅप वापरणार्‍यांना व्हाटसअ‍ॅपने बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात युजरवर तात्पुरती बंदी घालण्यात येणार असून संबंधीत युजरने फेक अ‍ॅप तातडीने अनइन्स्टॉल करण्याचे सूचीत करण्यात येणार आहे.तसेच त्यांनी अधिकृत अ‍ॅपचाच वापर करावा असे सांगण्यात येत आहे. अर्थात, याची अंमलबजावणी न करणार्‍या युजर्सच्या व्हाटसअ‍ॅप अकाऊंटला कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने अनेक युजर्सला याबाबतचे निर्देश पाठविले असून काही युजर्सवर तात्पुरती बंदी घातली आहे. यामुळे आता बनावट अ‍ॅपबाबत व्हाटसअ‍ॅपने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here