व्हाटसअ‍ॅपच्या अँड्रॉइड युजर्सला मिळणार फिंगरप्रिंट स्कॅनरचे सुरक्षा कवच

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपच्या अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला लवकरच फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा मिळणार असून पहिल्यांदा हे फिचर बीटा अवस्थेत देण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपवर बायोमॅट्रीक ऑथेंटीकेशनची सुविधा मिळणार असल्याची बाब आधीच समोर आली होती. यानंतर हे फिचर आयओएस प्रणालीसाठी देण्यात आले आहे. आता हीच सुविधा अँड्रॉइड प्रणालीवरून व्हाटसअ‍ॅप वापरणार्‍यांनाही मिळणार आहे. व्हाटसअ‍ॅपने आता आपल्या प्रयोगात्मक म्हणजेच बीटा आवृत्तीच्या युजर्ससाठी २.१९.८३ ही आवृत्ती सादर केली आहे. यातील फिचर्सबाबत WaBetaInfo या संकेतस्थळाने सविस्तर माहिती दिली आहे. या नवीन आवृत्तीतील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे फिंगरप्रिंट स्कॅनर होय. याच्या अंतर्गत आता कुणीही व्हाटसअ‍ॅपच्या सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट या विभागात बायोमॅट्रीकचा पर्याय निवडू शकतात. यानंतर कुणीही बोटाच्या ठशाच्या मदतीने व्हाटसअ‍ॅप लॉक करण्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. यामध्ये तात्काळ, १ मिनिटानंतर, १० मिनिटानंतर आणि ३० मिनिटांनंतर अशा चार पर्यायांचा समावेश करण्यात आलेला आहे. युजर यापैकी एका पर्यायाला निवडू शकतो.

सध्या फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा ही बीटा आवृत्तीसाठी देण्यात आलेली असून लवकरच याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here