व्हाटसअ‍ॅपमध्ये येणार इनअ‍ॅप ब्राऊजर

0

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरमध्ये लवकरच इनअ‍ॅप ब्राऊजर येणार असून यामुळे विविध लिंक्स या सुलभ व सुरक्षित पध्दतीत ओपन करता येणार आहेत.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी २.१९.७४ ही बीटा आवृत्ती सादर केली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या बीटा प्रोग्रॅमसाठी साइन-अप केलेल्या युजर्सला ही आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे. यात इन-अ‍ॅप ब्राऊजरची पहिली झलक दर्शविण्यात आली आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत तंतोतंत भाकित करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यात इन-अ‍ॅप या प्रकारातील ब्राऊजरबाबत माहिती दिलेली आहे. आपण व्हाटसअ‍ॅपवरून शेअर केलेल्या अनेक लिंक्स खोलत असतो. यातील बहुतांश लिंक्स या विविध प्रकारच्या (उदा. क्रोम, सफारी आदी) ब्राऊजर्सवर खुलत असतात. अर्थात या लिंक्स त्या ब्राऊजरवर रिडायरेक्ट होत असतात. मात्र व्हाटसअ‍ॅपमधील इन-अ‍ॅप ब्राऊजरमुळे आता कोणत्याही थर्ड पार्टी ब्राऊजरची आवश्यकता उरणार नाही. कारण प्रत्येक लिंक ही व्हाटसअ‍ॅपमधीलच ब्राऊजरमध्ये खुलणार आहे. याचे अनेक लाभ होणार आहेत. एक तर थर्ड पार्टी ब्राऊजरमध्ये लिंक उघडतांना तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो. व्हाटसअ‍ॅपमधील ब्राऊजरमध्ये हा वेळ कमी होणार आहे. तसेच कोणताही युजर जी लिंक खोलण्याच्या तयारीत आहे ती सुरक्षित आहे की नाही ? यात व्हायरस आहे का? यात फेक कंटेंटचा समावेश आहे का ? याबाबतची खातरजमा करण्यात येणार आहे. यात काहीही संशयास्पद आढळून आल्यास युजरला याचा अलर्ट देण्यात येणार आहे. एका अर्थाने, व्हाटसअ‍ॅपच्या इनअ‍ॅप ब्राऊजरमुळे वेब सर्फींग हे सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

व्हाटसअ‍ॅपमधील इनअ‍ॅप ब्राऊजर हे अद्याप सर्व युजर्सला देण्यात आलेले नाही. सध्या याला प्रयोगात्मक अर्थात बीटा अवस्थेत देण्यात आले असून लवकरच हे फिचर सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती WaBetaInfoच्या वृत्तात देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here