व्हाटसअ‍ॅपच्या अँड्रॉइड अ‍ॅपवर येणार ‘हा’ शॉर्टकट

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठी नवीन शॉर्टकट देण्याची तयारी केली असून पहिल्यांदा याला प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आले आहे.

व्हाटसअ‍ॅपची २.१९.१८९ ही बीटा आवृत्ती युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे. यात क्युआर कोड स्कॅनरची सुविधा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. अद्याप हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले नसले तरी भविष्यात याची सुविधा युजर्सला मिळणार आहे. याच्या अंतर्गत युजर हा क्युआर कोड स्कॅनींगच्या माध्यमातून आपल्या कॉन्टॅक्टची माहिती दुसर्‍या युजरला देऊ शकेल. यासाठी लवकरच व्हाटसअ‍ॅपवर शॉर्टकट देण्यात येणार असल्याची माहिती WABetaInfo या संकेतस्थळाने दिली आहे. या शॉर्टकटवर स्कॅन आणि शेअर या दोन स्टेप्स देण्यात येणार आहेत. अर्थात, अतिशय सुलभ पध्दतीत माहिती शेअर करण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हाटसअ‍ॅपने अलीकडच्या काळात नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटाच लावल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच व्हाटसअ‍ॅपच्या स्टेटस्ला फेसबुकवर स्टोरीच्या स्वरूपात शेअर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अद्याप हे फिचर सर्व युजर्ससाठी कार्यान्वित झालेले नसतांनाच आता क्युआर कोड स्कॅनरसाठीचा शॉर्टकट येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here