व्हीयूने सादर केली फोर-के स्मार्ट टिव्हींची मालिका

0

व्हीयू कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड प्रणालीवर चालणारी व फोर-के रेझोल्युशन क्षमतेची नवीन मालिका सादर केली आहे.

भारतीय बाजारपेठेत सध्या फोर-के क्षमतेच्या टिव्हीची लोकप्रियता वाढीस लागली आहे. यामुळे बहुतांश कंपन्या याच प्रकारातील विविध मॉडेल्स सादर करतांना दिसून येत आहेत. या अनुषंगाने व्हीयू टेलीव्हीजन कंपनीनेही याच प्रकारातील अर्थात फोर-के क्षमता असणारे प्रिमीयम अँड्रॉइड या नावाने चार मॉडेल्स सादर केले आहेत. हे मॉडेल्स अनुक्रमे ४३, ५०, ५५ आणि ६३ इंच आकारमानांचे असून त्यांचे मूल्य ४३,०००; ५१,०००; ५९,००० आणि १,१०,००० रूपये आहे. तर या मॉडेल्सला लाँचींग ऑफर म्हणून फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात सादर करण्यात आले असून यांचे मूल्य अनुक्रमे ३०,९९९; ३६,९९९; ४१,९९९ आणि ६५,९९९ रूपये इतके आहे.

वर नमूद केल्यानुसार यातील प्रत्येक मॉडेलचा डिस्प्ले हा फोर-के क्षमतेचा आहे. तसेच यामध्ये एचडीआर १० व डॉल्बी व्हिजन या प्रणालींचा सपोर्ट असल्यामुळे यावर अगदी सजीव चलचित्र पाहता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. उत्तम दर्जाच्या ध्वनीसाठी यामध्ये डॉल्बी ऑडिओ प्रदान करण्यात आलेला आहे. हे चारही स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या ओरियो या प्रणालीवर चालणारे असून यात गुगल प्ले स्टोअरवरील सर्व अ‍ॅप्स इन्स्टॉल करून वापरता येणार आहेत. याशिवाय यात हंगामा, इरॉस नाऊ, सोनी लिव्ह, हॉटस्टार, झी५ आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आली आहेत. याचा वापर करण्यासाठी अ‍ॅक्टीव्हॉईस या प्रकारातील रिमोट कंट्रोल देण्यात आलेला आहे. यावर असिस्टंट, युट्युब व गुगल प्ले स्टोअरसाठी स्वतंत्र बटन्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here