विवो व्ही १५ स्मार्टफोनचे अनावरण

0

विवो कंपनीने आपला विवो व्ही १५ हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

विवो कंपनीने आधीच भारतीय बाजारपेठेत व्ही १५ प्रो हे मॉडेल लाँच केले आहे. याचीच थोडे कमी फिचर्स असणारी आवृत्ती विवो व्ही १५ या माध्यमातून ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. हे मॉडेल पहिल्यांदा थायलंडमध्ये मिळणार असून लवकरच याला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश फिचर्स हे मूळ म्हणजेच व्ही १५ प्रो या मॉडेलनुसारच आहेत. मात्र यातील प्रोसेसर बदलण्यात आलेला आहे. या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६७५ ऐवजी हेलीओ पी ७० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. तसेच यामध्ये मूळ मॉडेलनुसार इन-डिस्प्ले या फिंगरप्रिंट स्कॅनरला दिलेले नाही. याऐवजी याला मागील बाजूस देण्यात आलेले आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ मॉडेलनुसारच आहेत.

विवो व्ही १५ या मॉडेलमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस (२३१६ बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा व १९:५:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये ४८, ८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये पॉप-अप या प्रकारातील ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर यातील बॅटरी ३,७०० मिलीअँपिअर क्षमतेची असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here