विवो व्ही १५ स्मार्टफोन भारतात लाँच

0

विवोने विवो व्ही १५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात दर्जेदार फ्रंट कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

विवोने अलीकडेच व्ही १५ प्रो हे मॉडेल लाँच केले होते. यानंतर आता याचीच नवीन आवृत्ती विवो व्ही १५ या मॉडेलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. यात मूळ आवृत्तीपेक्षा कमी स्टोअरेज देण्यात आलेले आहे. व्ही १५ प्रो या मॉडेलमध्ये १२८ जीबी स्टोअरेज होते. तर व्ही १५ या मॉडेलमध्ये ६४ जीबी स्टोअरेज असणार आहे. या स्मार्टफोनचे मूल्य २३,९९० रूपये असून याला रॉयल ब्ल्यू, फ्रोझन ब्लॅक आणि ग्लॅमर रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे मॉडेल अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि विवोच्या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहे.

यातील सेल्फी कॅमेरा हा याचा सेलींग पॉइंट ठरणार आहे. याआधी विवोने नेक्स या मालिकेतील दोन स्मार्टफोनमध्ये पॉप-अप या प्रकारातील फ्रंट कॅमेरे दिलेले होते. यानंतर विवो व्ही १५ प्रो या मॉडेलमध्ये तब्बल ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिला होता. विवो व्ही १५ या मॉडेलमध्येही हाच कॅमेरा दिला आहे. या फ्रंट कॅमेर्‍यासाठी स्वतंत्र गुगल असिस्टंटची की देण्यात आलेली आहे. तर याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १२, ८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमर्‍यांचा समावेश आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून याला ड्युअल इंजिन फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाचा सपोर्ट दिलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस हा युजर इंटरफेस असणार आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, विवो व्हि१५ प्रो या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एसअमोलेड अल्ट्रा फुलव्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात मीडियाटेकचा हेलिओ पी ७० हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here