व्हाटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करणार्‍यांना करा ब्लॉक !

    0

    व्हाटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करणार्‍या आपल्या कॉन्टॅक्ट यादीतील युजर्सलाही ब्लॉक करण्याची सुविधा आता मिळणार आहे.

    कुणीही कुणालाही व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करत असल्याने अनेक युजर्स हैराण झालेले आहेत. यामुळे या वर्षीच्या एप्रिल महिन्यात व्हाटसअ‍ॅपने ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापासून मज्जाव करणारे फिचर युजर्सला प्रदान केले होते. यामुळे आता कुणीही आपल्या मित्र यादीत नसणार्‍याकडून ग्रुपमध्ये अ‍ॅड करणार्‍यांवर बंधन लादण्यात आले होते. अर्थात, अपरिचीतांकडून ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याच्या त्रासापासून युजर्सची मुक्तता झाली होती. असे असले तरी, कॉन्टॅक्ट यादीत असणार्‍यांकडून ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याचा त्रास सुरूच होता. या पार्श्‍वभूमिवर, आता कॉन्टॅक्ट ग्रुपमध्ये असणार्‍यांनाही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापासून मज्जाव करण्यासाठी ब्लॉक करण्याचा नामी उपाय उपलब्ध करण्यात आला आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अचूक भाकीत करणार्‍या WaBetaInfo या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केली आहे.

    या वृत्तानुसार, आता युजर्सला प्रायव्हसी सेटींगमध्ये नवीन पर्याय देण्यात येणार आहे. यासाठी सेटींग-अकाऊंट-प्रायव्हसी-ग्रुप या मार्गाने जावे लागेल. येथे हु कॅन अ‍ॅड मी टू द ग्रुप्स याबाबत पर्याय दिलेले आहेत. यामध्ये ”एव्हरीवन, माय कॉन्टॅक्टस् आणि माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट…” असे तीन पर्याय दिलेले असतील. यातील पहिला पर्याय निवडल्यास आपल्याला कुणीही ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकतो. दुसरा पर्याय निवडल्यास आपल्या मित्रांच्या यादीत असणारे ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊ शकतात. तर तिसरा पर्याय हा नवीन आहे. यात आपल्या मित्र यादीतील कुणालाही ब्लॉक करण्याची सुविधा येथे देण्यात आली आहे. यामुळे एका अर्थाने संबंधीत युजरला ब्लॉक करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आले असून लवकरच सर्व युजर्सला याचा वापर करता येणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here