ट्विटरचा डार्क मोड झालाय अजून ‘डार्क’ !

0

ट्विटरने आधीच प्रदान केलेल्या डार्क मोडमध्ये अजून एक नवीन पर्याय देऊन याला अजून गडद काळ्या स्वरूपात वापरण्याची सुविधा दिली आहे.

अलीकडच्या काळात डार्क मोड खूप लोकप्रिय झाला आहे. याच्या मदतीने कमी प्रकाशात अधिक चांगल्या पध्दतीत पार्श्‍वभाग पाहता येतो. परिणामी, युजर्सच्या डोळ्यांवर कमी प्रमाणात ताण येतो. यामुळे याला युजर्सची पसंती मिळाली आहे. यामुळे बहुतांश सोशल साईटने याला सादर केले आहे. या अनुषंगाने ट्विटरने आपल्या युजर्ससाठी आधीच डार्क मोड प्रदान केला आहे. यात आता थोड्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. ट्विटरच्या आधीच्या डार्क मोडमध्ये काळ्यासह थोड्या प्रमाणात निळ्या रंगाच्या पार्श्‍वभागाचा समावेश होता. आता या मोडमध्ये अगदी गडद काळा रंग देण्यात आलेला आहे. म्हणजेच ट्विटरचा डार्क मोड हा अजून ‘डार्क’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्विटरचा डार्क मोड आता दोन प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. यामध्ये आधीच्या डार्क मोडसोबत आता लाईटस् आऊट हा नवीन पर्याय देण्यात आला आहे. कुणीही युजर सेटींगमध्ये जाऊन डिस्प्ले अँड साऊंड या विभागात आपल्याला हवा तो मोड अ‍ॅक्टीव्हेट करू शकणार आहे. ट्विटरने एका ट्विटच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुलभ पध्दतीत कशी वापरता येईल ? याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here