ट्विटरवर येणार कॅमेरा फिचर

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने आपल्या युजर्ससाठी स्वतंत्र कॅमेर्‍याचे फिचर देण्याची घोषणा केली असून लवकरच याला सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीतही ट्विटरवर कुणीही अगदी सुलभपणे प्रतिमा अथवा व्हिडीओ अपलोड करू शकतो. मात्र ही प्रक्रिया अजून सोपी व्हावी म्हणून ट्विटर लवकरच डेडीकेटेड कॅमेरा हे फिचर देणार आहे. ट्विटरने एका ट्विटच्या माध्यमातून ही घोषणा केली असून यासोबत संबंधीत फिचरची माहिती देणारा व्हिडीओदेखील अपलोड केला आहे. यात हे फिचर कसे वापरावे याची माहिती दिली आहे. यानुसार कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनवर स्वाईप करून थेट आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याशी संलग्न होऊ शकतो. यानंतर या कॅमेर्‍यातून काढलेली प्रतिमा अथवा व्हिडीओ तात्काळ शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात दोन मिनिटांपर्यंत व्हिडीओ कॅप्चर करून शेअर करता येणार आहे. यात युजर आपल्या फ्रंट कॅमेर्‍याचा उपयोगदेखील सहजपणे करू शकतो. अर्थात रिअर आणि बॅक कॅमेर्‍यांमध्ये शिफ्ट करण्याची सोपी सुविधा यात दिली आहे. यातून पेरिस्कोपवर लाईव्ह स्ट्रीम करण्याची सुविधादेखील मिळणार आहे. यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे फिल्टर्स देण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, ट्विटर हे स्टोरीज प्रमाणे फिचर देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र ट्विटरने आपल्या कॅमेरा फिचरमध्ये याचा समावेश केलेला नाही. हे फिचर लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here