व्हाटसअ‍ॅपचे २०१८ मधील टॉप-५ फीचर्स

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने या वर्षी आपल्या युजर्सला अनेक फीचर्स प्रदान केले असून यातील टॉप पाच फिचर्सची माहिती देण्यात येत आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्सला वेळोवेळी नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटाच सुरू केला आहे. २०१८ या वर्षाचा विचार केला असता, युजर्सला २० पेक्षा जास्त नवीन फिचर्स आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. यातील अतिशय उपयुक्त ठरणार्‍या टॉप-५ फिचर्सचा हा आढावा

१) व्हाटसअ‍ॅप स्टिकर्स :- व्हाटसअ‍ॅपचे या वर्षातील सर्वात उत्कंठावर्धक फिचर म्हणजे स्टिकर्स आहे. याच्या अंतर्गत योजना विविध प्रतिमांपासून स्टीकर करून ते मॅसेंजर वर शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. पहिल्यांदा हे फीचर प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आले होते नंतर मात्र याला अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपलब्ध करण्यात आले असून याला युजर्सची पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे.

२) पिक्चर-इन-पिक्चर मोड

व्हाटसअ‍ॅपने याच वर्षी पिक्चर-इन-पिक्चर हा मोड प्रदान केला आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर व्हाटसअ‍ॅपचे अ‍ॅप न सोडतानाही व्हिडीओ पाहू शकतो. याच्यामुळे फेसबुक युट्यूब आणि इन्टाग्रामवरील व्हिडीओ पाहणे हे अधिक सुलभ झाले आहे.

३) संशयास्पद लिंक शोधण्याची प्रणाली

व्हाटसअ‍ॅपने यावर्षी संशयास्पद लिंक शोधून काढण्यासाठी एक नवीन प्रणाली प्रदान केली आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर फॉरवर्ड करत असलेल्या लिंकमध्ये कोणत्याही प्रकारच्या घातक विषाणूंचा समावेश असल्यास त्याची माहिती युजरला देण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. हे फीचर अद्याप प्राथमिक अवस्थेत असले तरी येत्या काही महिन्यांमध्ये याला चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात येईल असे मानले जात आहे.

४) फॉरवर्ड लिमिट

व्हाटसअ‍ॅपने यावर्षी फेक न्यूजला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्याचे दिसून येत आहेत. याच्याच अंतर्गत फॉरवर्डेड मॅसेजला एका वेळी फक्त पाच ग्रुप वा वैयक्तिक चॅटवर फॉरवर्ड करण्याची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून फेक न्यूज ला अतिशय परिणामकारक रीतीने आळा घालण्यात येईल असे मानले जात आहे.

५) ग्रुप कॉलिंग

व्हाटसअ‍ॅपने या वर्षी आपल्या युजर्ससाठी ग्रुप कॉलिंग ही नावीन्यपूर्ण सुविधा दिली आहे त्याच्या अंतर्गत कुणीही युजर हा अन्य युजर्स सोबत एकाच वेळेस कॉल करू शकतो. ही कॉन्फरन्स कॉल सारखी सुविधा आहे. यासाठी सध्या चार युजर्सची मर्यादा घालण्यात आली आहे. तथापि, येत्या काही दिवसांमध्ये ही मर्यादा वाढवण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here