अबब…या स्मार्टफोनमध्ये आहे ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0

शाओमी कंपनीने तब्बल ४८ मेगापिक्सल्स असणारा रेडमी नोट ७ हा कॅमेरा बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा करून धमाल उडवून दिली आहे.

कॅमेरा हा स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाचा घटक आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांनी उत्तमोत्तम कॅमेर्‍याने युक्त असणारे मॉडेल्स सादर करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे दिवसेंदिवस जास्तीत जास्त मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, शाओमी कंपनीने आपल्या रेडमी नोट ७ या स्मार्टफोनमध्ये तब्बल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करून या स्पर्धेत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यातील एक कॅमेरा हा सोनीच्या आयएमएक्स५८६ सेन्सरने युक्त असून याची क्षमता ४८ मेगापिक्सल्सची आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून तो प्रतिमेची डेप्थ मापन करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर आधारित मीयुआय १० या प्रणालीवर चालणारा असून यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, शाओमीच्या रेडमी नोट ७ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्रामार ग्लास डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरणदेखील देण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात नॉचयुक्त डिस्प्लेची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या रॅमसाठी ३, ४ आणि ६ जीबी तर स्टोअरेजसाठी ३२ आणि ६४ जीबींचे पर्याय दिलेले आहेत. हा स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये मिळणार असून लवकरच याला भारतात लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here