अरेच्चा…आता चक्क माऊसमध्येच सामावलाय संगणक !

0

माऊसमध्येच संगणक असू शकतो यावर आपला विश्‍वास बसणार नाही, तथापि, एका तंत्रज्ञाने ही कमाल करून दाखवली आहे.

रास्पबेरी पाय हे मुक्तस्त्रोत म्हणजेच ओपन सोर्समधील हार्डवेअर असून हा एक चिमुकला संगणक आहे. यात हवे तसे भन्नाट बदल करता येतात. या अनुषंगाने एका तंत्रज्ञाने कंप्युटर माऊसची निर्मिती केलेली आहे. हे उपकरण कोणत्याही संगणकासोबत वापरता येणार्‍या माऊस प्रमाणेच दिसते. मात्र याची खासियत म्हणजे यामध्ये चक्क संगणकही आहे. हो…संगणक आणि तोदेखील पूर्णपणे कार्यरत असणारा ! या तंत्रज्ञाने हा प्रयोग करण्यासाठी थ्री-डी प्रिंटींगच्या मदतीने आकाराने थोडा मोठा असणारा माऊस तयार करून घेतला. याच्या पुढील बाजूस लहानसा डिस्प्ले लावण्यात आला असून खालील बाजूने लहान कि-बोर्ड दिलेला आहे. हा कि-बोर्ड खालील बाजूस सरकवून पॅक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. माऊसच्या समोरील बाजूस असणार्‍या स्वीचच्या मदतीने हा पिटुकला संगणक सुरू/बंद करता येतो. यामध्ये सिंगल कोअर प्रोसेसर असून याची रॅम ५१२ मेगाबाईट इतकी आहे. यातील १.५ इंच आकारमानाचा रंगीत डिस्प्ले हा १२९ बाय १२८ पिक्सल्स क्षमतेचा आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायची सुविधा दिलेली आहे.

हा पिटुकल संगणक अगदी बेसिक पध्दतीच्या फंक्शन्ससाठी वापरता येतो. युट्युबवर याचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असून हे मॉडेल चर्चेचा विषय बनले आहे.

पहा : या चिमुकल्या संगणकाची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here