टेक्नोचे दोन किफायतशीर स्मार्टफोन्स दाखल

0

टेक्नो मोबाईल्स या कंपनीने स्पार्क गो आणि स्पार्क ४ एयर हे दोन अत्यंत किफायतशीर मूल्य असणारे स्मार्टफोन्स ग्राहकांना सादर केले आहेत.

टेक्नो कंपनी आपल्या किफायतशीर मॉडेल्ससाठी ख्यात आहे. या अनुषंगाने स्पार्क गो आणि स्पार्क ४ एयर हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहेत. त्यांचे मूल्य अनुक्रमे ५,४९९ आणि ६,९९९ रूपये आहे. यातील स्पार्क गो हा स्मार्टफोन अतिशय किफायतशीर मूल्य असणारा आहे. यात ६.१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेचा असेल.

दरम्यान, टेक्नो स्पार्क ४ एयर या मॉडेलमध्येही ६.१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १३ मेगापिक्सल्स आणि व्हीजीए क्षमतेचे कॅमेरे दिलेले आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यातील बॅटरीदेखील ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here