स्पॉटीफाय भारतात दाखल : जाणून घ्या सर्व प्लॅन्स

0
spotify

अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर स्पॉटीफाय ही ऑडिओ स्ट्रीमिंग सेवा अखेर भारतात उपलब्ध झाली असून यामुळे या क्षेत्रात चुरशीची स्पर्धा निर्माण होणार आहे.

स्पॉटीफाय ही ऑडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी म्हणून गणली जाते. गत अनेक महिन्यांपासून स्पॉटीफाय आपली सेवा भारतात सुरू करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून या कंपनीने भारतात अधिकृतपणे एंट्री केली आहे. या कंपनीने वेबसह अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. याचे अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

स्पॉटीफाय कंपनीची सेवा पहिल्या ३० दिवसांच्या ट्रायलसाठी मोफत आहे. यानंतर मात्र युजरला पैसे अदा करावे लागणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी स्पॉटीफायने अगदी एक दिवसापासून ते एका वर्षापर्यंतची कालमर्यादा असणारे विविध प्लॅन्स सादर केले आहेत. यात एक दिवसांसाठी १३ रूपये; सात दिवसांसाठी ३९ रूपये, महिन्यासाठी १२९ रूपये; तीन महिन्यांसाठी ३८९ रूपये; सहा महिन्यांसाठी ७१९ रूपये तर एक वर्षासाठी १,४२८ रूपये अशी आकारणी करण्यात येणार आहे. स्पॉटीफायवर गीत-संगीताचा अजस्त्र खजिना आहे. भारतात येण्याआधीच स्पॉटीफायने टी-सेरीजसोबत करार केला असून यामुळे यावर तब्बल १.६० लाख भारतीय गाणी ऐकता येणार आहे. दरम्यान, स्पॉटीफायच्या आगमनामुळे ऑडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात प्रचंड चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गुगल प्ले म्युझिक, अमेझॉन प्राईम म्युझिक, जिओसावन, विंक, गाना, अ‍ॅपल म्युझिक आदी सेवांना तगडी स्पर्धा निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here