साऊंडवनचा वॉटरप्रूफ वायरलेस स्पीकर

0

साऊंडवन कंपनीने ड्रम हा नवीन वायरलेस स्पीकर सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेत वायरलेस स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रियत होत आहेत. यामुळे विविध कंपन्या सातत्याने नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. या अनुषंगाने साऊंडवन या मूळच्या हाँगकाँग येथील कंपनीने ड्रम हा नवीन वायरलेस स्पीकर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार याचा आकार हा ड्रमसारखा अर्थात लंबगोलाकार आहे. याला अगदी सहजरितीने कुणीही कुठेही नेऊ शकतो. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या वायरलेस स्पीकर रफ युजसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा स्पीकर डस्टप्रूफ व शॉकप्रूफ असल्यामुळे तो भारतातील विषम वातावरणताही सहजपणे वापरता येणार आहे. याशिवाय, हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे याला पावसासह शॉवरमध्ये वापरले तरी यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

साऊंडवनच्या ड्रम स्पीकरमध्ये स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांवरील संगीत हे ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीच्या मदतीने ऐकता येणार आहे. याशिवाय, यामध्ये ऑक्झ-इन पोर्ट असल्यामुळे याचा वायर्ड स्पीकर म्हणूनदेखील उपयोग करता येणार आहे. याला युएसबी पोर्ट व मायक्रो-एसडी कार्ड रीडरची जोडदेखील देण्यात आलेली आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोन असल्यामुळे याचा कॉलींगसाठीही उपयोग होणार आहे. यामध्ये डिजीटल ऑडिओ प्रोसेसर दिला असून याच्या मदतीने अतिशय दर्जेदार ध्वनीची अनुभूती येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या वरील बाजूस विविध फंक्शन्सच्या वापरासाठी बटन्स देण्यात आले आहेत. याचे मूल्य ३४९० रूपये असले तरी प्रारंभी याला सवलतीच्या १,९९० रूपये मूल्यात फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, पेटीएम व मिंत्रा या ऑनलाईन मंचावरून उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here