लवकरच येणार शाओमीचा अँड्रॉइड गो प्रणालीवरील स्मार्टफोन

0
Xiaomi

शाओमी कंपनी शाओमी गो या नावाने अँड्रॉइड गो या प्रणालीवरील स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार आहे.

शाओमी कंपनीने सातत्याने किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स असणारे मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत. यामुळे या कंपनीला भारतात अतिशय उत्तम यश लाभले आहे. यातच आता लवकरच ही कंपनी शाओमी गो हे मॉडेल सादर करणार असून हा कंपनीचा आजवरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल अशी माहिती समोर आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन असणार आहे. अँड्रॉइड गो या प्र्रणालीच्या अंतर्गत ५१२ एमबी अथवा १ जीबी रॅम असणार्‍या स्मार्टफोन युजर्सला अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीमधील सर्व फिचर्स वापरण्याची सुविधा देण्यात येते. यासाठी युट्युब गो, गुगल गो आदींसह अन्य स्वतंत्र अ‍ॅपदेखील इनबिल्ट अवस्थेत देण्यात येतात. शाओमी रेडमी गो हे मॉडेल लवकरच विविध देशांमध्ये सादर करण्यात येणार असून याची बेंचमार्क करणार्‍या विविध संकेतस्थळांवर लिस्टींगदेखील करण्यात आली आहे.

या लिस्टींगनुसार, हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय (गो एडिशन) या प्रणालीवर चालणारा असून याची रॅम १ जीबी असणार आहे. यामध्ये १८:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला असेल. या बाबींचा अपवाद वगळता यातील अन्य फिचर्सची माहिती देण्यात आलेली नाही. भारतात हे मॉडेल पाच हजारांच्या आत सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे. यामुळे अर्थातच, या मॉडेलच्या आगमनाबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here