लवकरच येणार ट्विटरचे बीटा अ‍ॅप

0
twitter app, ट्विटर

ट्विटर लवकरच बीटा अ‍ॅप सादर करणार असून या माध्यमातून आगामी फिचर्सची चाचणी करणे सुलभ होणार आहे.

व्हाटसअ‍ॅपसह अनेक सोशल मीडिया सेवा पुरवठादारांनी आपापल्या युजर्सला बीटा अर्थात प्रयोगात्मक आवृत्ती वापरण्याची सुविधा प्रदान केली आहे. यासाठी साईन-अप केलेल्या युजर्सला संबंधीत सेवांचे सर्व आगामी फिचर्स हे पहिल्यांदा वापरता येतात. यातून मिळालेल्या फिडबॅकच्या आधारे आवश्यक त्या सुधारणा करून संबंधीत फिचर हे कार्यान्वित करण्यात येत असते. याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. आता ट्विटरनेही याच प्रकारे बीटा आवृत्ती सादर करण्यचे संकेत दिले आहेत. ट्विटरच्या वरिष्ठ अधिकारी सारा हैदर यांनी टेकक्रंच या टेक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याचे सूतोवाच केले आहे. अर्थात अन्य बीटा प्रोग्रॅमपेक्षा ट्विटर थोडा वेगळा मार्ग अवलंबणार आहे. यासाठी बीटा प्रोग्रॅमच्या साईन-अप ऐवजी स्वतंत्र बीटा अ‍ॅप लाँच करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप ट्विटरच्या अ‍ॅपपेक्षा वेगळे असून यात ट्विटरच्या सर्व आगामी फिचर्सला आधीच देण्यात येणार आहे. या सर्व फिचर्सच्या वापरकर्त्यांच्या अनुभवातून आवश्यक त्या सुधारणा करून मग नंतरच याला सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सारा हैदर यांनी या मुलाखतीमध्ये दिलेली आहे.

वास्तविक पाहता ट्विटरने आधीच एक्सपेरिमेंट सेंटरच्या माध्यमातून मर्यादीत प्रमाणातील बीटा प्रोग्रॅम राबविला आहे. मात्र याची व्याप्ती वाढवण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here