गुगल हँगआऊट होणार बंद

0

गुगलची हँगआऊट ही सेवा लवकरच बंद होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. याबाबत गुगल लवकरच अधिकृत घोषणा करू शकते.

गुगलच्या अनेक सेवा या प्रचंड गतीने विस्तारत आहेत. तर दुसरीकडे बर्‍याचा सेवांना अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांना बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अलीकडेच गुगल प्लस ही सेवा बंद करण्यात आल्याचे उदाहरण हे यासाठी अतिशय समर्पक असेच आहे. या पाठोपाठ आता हँगआऊट चॅट बंद करण्यात येणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. याबाबत ९टू५ गुगल या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार गुगलने हँगआऊटला बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षाच्या शेवटी अथवा २०२०च्या प्रारंभी याला पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची शक्यता यात वर्तविण्यात आली आहे. याबाबत गुगल लवकरच आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करू शकते.

गुगलने २०१३ साली हँगआऊट सेवा सुरू केली होती. गुगल टॉक सेवेला पर्याय म्हणून हँगआऊट सुरू करण्यात आले होते. याला प्रारंभी बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला. मात्र नंतर ते मागे पडत गेतले. गुगलने २०१६च्या आपल्या आय/ओ परिषदेत अ‍ॅलो आणि ड्युओ हे दोन स्वतंत्र अ‍ॅप सादर केल्यानंतर हँगआऊटचे भविष्य अधांतरी असल्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, हँगआऊटचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले जाईल अशी ग्वाही गुगलतर्फे देण्यात आली होती. याचे हँगआऊट मिटींग असे नामांतरही करण्यात आले होते. मात्र या सेवेला अपेक्षेइतका प्रतिसाद न लाभल्यामुळे याला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here