गुगल ड्युओ आता वेबवरही वापरता येणार

0
ड्युओ, google duo

गुगलने आपले ड्युओ हे अ‍ॅप आता वेबवरून वापरण्याची सुविधा प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत.

नाइन टू फाइव्ह गुगल या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. गुगलने अ‍ॅलो आणि ड्युओ हे दोन्ही अ‍ॅप सोबत सादर केले होते. यातील अ‍ॅलो हे मर्यादीत प्रमाणात यशस्वी झाले असले तरी ड्युओला बर्‍यापैकी लोकप्रियता लाभली आहे. आजवर ड्युओ हे फक्त अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी सादर केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येत आहे. तथापि, याला लवकरच संगणकावरून वापरता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात गुगल ड्युओ फक्त क्रोम ब्राऊजरवरून वापरता येईल. यानंतर मात्र याला फायरफॉक्ससह अन्य ब्राऊजर्ससाठी सादर करण्यात येईल. अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे. गुगलने सर्च, जीमेल, युट्युबसह अन्य सेवांमध्ये जोरदार आघाडी घेतली असली तरी सोशल मीडिया आणि मॅसेंजरसाठी केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर गुगल ड्युओ सेवेला लोकप्रिय करण्यासाठी आता याला वेबवर सादर करण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here