लवकरच फायरफॉक्सवर ऑटो विडिओ ब्लॉक करण्याची सुविधा

0

मोझिलाने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊझरच्या आगामी आवृत्तीमध्ये त्रासदायक ऑटो प्ले या प्रकारातील व्हिडिओ ब्लॉक करण्याची सुविधा देण्याचे जाहीर केले आहे.

सध्या बहुतांश संकेतस्थळांवर व विशेष करून न्यूज पोर्टल्सवर ऑटो प्ले होणारे व्हिडिओ हे युजर्सला अतिशय त्रासदायक ठरत आहेत. या माध्यमातून विविध संकेतस्थळांवर जाहिराती देण्यात येत असतात. यातून मास्टरला पैसे मिळत असले तरी युजरसाठी मात्र हा सर्व प्रकार खूप त्रासदायक असतो. याची दखल घेत गुगलने आपल्या क्रोम ब्राउजर मध्ये यापूर्वीच ऑटो प्ले होणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याची सुविधा दिली आहे. आता मोझिला कंपनीने आपल्या फायरफॉक्स या ब्राऊझर मध्येही याच प्रकारची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. फायरफॉक्सची नवीन आवृत्ती १९ मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. यामध्ये हे फीचर देण्यात येणार आहे. मोझिलाने याबाबत एका ब्लॉक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाहीर केली आहे.

फायरफॉक्सच्या डेस्कटॉप आणि अँड्रॉईडसाठी असणार्‍या ब्राऊजरमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत युजरला ऑटोप्ले होणारे व्हिडीओ ध्वनीसह ऐकण्याचा पर्यायदेखील देण्यात येणार आहे. अर्थात, त्याने निवड केल्यास त्याला विडिओ दिसेल, अन्यथा व्हिडिओ ब्लॉक राहणार आहे. अर्थात युजरला विडिओ सुरू करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे. या माध्यमातून फायरफॉक्स वापरणार्या युजर्सशी करणार्‍या त्रासदायक जाहिरातींपासून मुक्तता होणार आहे अर्थात याचा जाहिरातदारांना आणि अर्थातच मोठा फटका बसणार हे मात्र निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here