लवकरच येणार फेसबुकची स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी

0

सुरक्षित डिजीटल व्यवहारांसाठी फेसबुक लवकरच स्वतंत्र क्रिप्टोकरन्सी सादर करणार असल्याचे वृत्त असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

क्रिप्टोकरन्सीजच्या माध्यमातून करण्यात येणार व्यवहार हे अतिशय सुरक्षित असतात. यामुळे जगभरात बीटकॉईन्सप्रमाणे अनेक आभासी चलने (व्हर्च्युअल करन्सीज) अस्तित्वात आली आहेत. यातच ब्लॉकचेन या प्रणालीच्या मदतीने क्रिप्टोकरन्सीजला अभेद्य सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे. यामुळे जगभरातील आघाडीच्या टेक कंपन्या याकडे वळल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकनेही आपले स्वत:चे ई-चलन आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचे संकेत आता मिळाले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसून गोपनीयता पाळण्यात येत आहे. तथापि, विश्‍वसनीय सूत्रांच्या आधारे ब्ल्युमबर्गने याबाबत वृत्त दिले आहे.

यानुसार फेसबुकची क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. याचा पहिला वापर हा व्हाटसअ‍ॅपवर करण्यात येणार आहे. याच्याच मदतीने व्हाटसअ‍ॅपचे युजर्स हे एकमेकांशी ऑनलाईन आर्थिक देवाण-घेवाण करू शकतील. वास्तविक पाहता, व्हाटसअ‍ॅप एकीकडे स्वतंत्र पेमेंट सिस्टीम सुरू करण्याच्या तयारी आहे. भारतात याची चाचणी सुरू झाली असून याला सर्व युजर्ससाठी लवकरच खुले करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. तर दुसरीकडे फेसबुक आपल्या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला डिजीटल व्यवहारांसाठी नवीन माध्यम उपलब्ध करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here