सेनहैजरचे प्रिमीयम वायरलेस इयरबडस् दाखल

0

सेनहैजर कंपनीने मोमेंटम ट्रू वायरलेस हे प्रिमीयम म्हणजेच उच्च श्रेणीतील इयरबडस् भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत.

सेनहैजर कंपनी ही ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त नाव म्हणून गणली जाते. या कंपनीने अलीकडे भारतीय बाजारपेठेवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने मोमेंटम ट्रू वायरलेस हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. याचे मूल्य २४,९९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे उच्च श्रेणीतील इयरबडस् असून यात अनेक सरस फिचर्स आहेत. एक तर याचा आकार अतिशय आटोपशीर असून लूक हा अतिशय आकर्षक असा आहे. यात गुगल असिस्टंट आणि सिरी हे डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट देण्यात आले आहेत. याच्या मदतीने कुणीही व्हाईक कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून विविध फंक्शन्स वापरू शकतात. यामध्ये अतिशय उच्च दर्जाचे स्टीरीओ साऊंड ड्रायव्हर्स वापरण्यात आले असून यामुळे युजरला अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येते. यामध्ये क्वॉलकॉमच्या एपीटीएक्स आणि एपीटीएक्स लो-लेटन्सी तंत्रज्ञानाचा समावेश असून यामुळे इमर्सीव्ह साऊंडची अनुभुती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

सेनहैजरच्या या मॉडेलमध्ये ट्रान्सपरंट हियरिंग हे विशेष फिचर दिलेले आहे. यामुळे युजरला त्याच्या भोवतीच्या आवाजांची जाणीवसुध्दा राहणार आहे. तर यामध्ये नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाने युक्त असणारे दोन मायक्रोफोनदेखील देण्यात आले असूनन याच्या मदतीने याला कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉलींग करता येणार आहे. यात अतिशय दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे चार तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यासाठी सोबत देण्यात आलेल्या केसमध्येच चार्जर देण्यात आलेले आहे. हे इयरबडस् ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोन व अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येतात. यासाठी स्वतंत्र अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपदेखील सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here