सारेगामा कारवाचा मिनी भक्ती प्लेअर

0

सारेमागा कंपनीने आता कारवा मिनी भक्ती प्लेअर बाजारपेठेत सादर केला असून यात भक्तीगीतांचा समावेश करण्यात आला आहे.

सारेगामा कंपनीच्या कारवा या डिजीटल मीडिया प्लेअरला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे. याचे आजवर १० लाखांपेक्षा जास्त युनिट विकले गेल्याची माहिती मध्यंतरी कंपनीतर्फे जाहीर करण्यात आली होती. याचे विविध व्हेरियंट आजवर ग्राहकांना सादर करण्यात आले असून यातील प्रत्येकाला रसिकांची पसंती मिळाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता सारेगामा कारवा मिनी भक्ती प्लेअर सादर करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये भक्तीपर गीत-संगीताला प्राधान्य देण्यात आलेले आहे. यात ३५० भक्तीगिते ही इनबिल्ट स्वरूपात देण्यात आलेली आहेत. यामध्ये शिव, गणेश, राम, हनुमान, देवी आदींसह अन्य देवतांची गिते आहेत. यात भजन, आरती, मंत्र आदी विविध वर्गवारी देण्यात आलेल्या आहेत. यानुसार कुणीही गाणे सर्च करून ते ऐकू शकतो. या प्लेअरमध्ये आशा भोसले, अनुप जलोटा आदींसह अन्य गायकांच्या गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतात भक्ती संगीताची बाजारपेठ मोठी असून याचे कोट्यवधी चाहते आहेत. याचा विचार करता सारेगामा कारवा मिनी भक्ती प्लेअर लाँच करण्यात आले आहे. याचे मूल्य २,४९० रूपये असून सारेगामा ऑनलाईन स्टोअरसह देशभरातील शॉपीजमधून याला उपलब्ध करण्यात आले आहे. यात दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे चार तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये एफएम रेडिओ इनबिल्ट अवस्थेत दिला आहे. तसेच याला बाह्य स्पीकर म्हणून वापण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. या मॉडेलसाठी सारेगामा कंपनीने सहा महिन्यांची वॉरंटी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here