सॅनयोच्या स्मार्ट टिव्हींची मालिका सादर

0

सॅनयो कंपनीने भारतीय बाजारपेठेत नेब्युला या मालिकेत दोन स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

सॅनयो या जपानी कंपनीने ३२ आणि ४३ इंची डिस्प्ले असणारे स्मार्ट एलईडी टिव्ही भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे १२,९९९ आणि २२,९९९ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात. यातील ३२ इंची मॉडेलमध्ये एचडी रेडी म्हणजे १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तर ४३ इंची टिव्हीमध्ये फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असणार आहे. याची रॅम ७६८ मेगाबाईट असून इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके दिलेले आहे.

यातील ३२ इंची मॉडेलमध्ये ८ वॅट क्षमतेचे दोन स्पीकर आहेत. तर ४३ इंची मॉडेलमध्ये हे दोन्ही स्पीकर १० वॅट क्षमतेचे आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, युएसबी, एचडीएमआय आदी पर्याय प्रदान करण्यात आले आहेत. यावर नेटफ्लिक्स व युट्युबसारखे अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहेत. तर अन्य अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून वापरण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच यात स्मार्टफोनवरील कंटेंट हे मिराकास्ट फिचरच्या मदतीने स्मार्ट टिव्हीवर पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here