सॅमी कंपनीने सादर केला सर्वात स्वस्त स्मार्ट टिव्ही

1

सॅमी या नवीन कंपनीने भारतीय ग्राहकांना फक्त ४,९९९ रूपये मूल्यात ३२ इंची स्मार्ट टिव्ही सादर केला आहे.

सध्या बाजारपेठेत स्मार्ट टिव्ही लोकप्रिय होत आहेत. एकीकडे कंपन्या नवनवीन मॉडेल्स सादर करत असून यांचे मूल्यदेखील कमी होऊ लागले आहे. या अनुषंगाने सॅमी कंपनीने फक्त ४,९९९ रूपयात ३२ इंची स्मार्ट टिव्ही सादर करण्याची घोषणा केली आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्ट टिव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अर्थात, यासोबत जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागणार असल्याचे नमूद केले आहे. असे असले तरी हा टिव्ही सात हजारांच्या आसपास ग्राहकांना मिळू शकतो. अर्थात हे मूल्यदेखील अन्य कंपन्यांच्या मॉडेल्सच्या तुलनेत कमी आहे. यामुळे आता टिव्ही संचाच्या क्षेत्रातही चुरशीची स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सॅम कंपनीच्या या टिव्हीचा डिस्प्ले हा १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस या प्रकारातील आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या किटकॅट या तुलनेत जुन्या आवृत्तीवर चालणारे आहे. ध्वनीसाठी यामध्ये १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर देण्यात आलेले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये एचडीएमआय, युएसबी आदी पर्याय दिलेले आहेत. यासोबत रिमोट कंट्रोल दिला असून याच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यातील काही बाबी या अन्य मॉडेल्सच्या तुलनेत कमी दर्जाच्या आहेत. यामुळे या मॉडेलला बाजारपेठेत नेमका कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here