सॅमसंग गॅलेक्सी ए२०ई आणि ए४० स्मार्टफोन्सचे अनावरण

0

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए या मालिकेत दोन नवीन स्मार्टफोन्सची भर टाकत ए२०ई आणि ए४० या मॉडेल्सचे अनावरण केले आहे.

सॅमसंगने अलीकडच्या काळात अतिशय आक्रमक धोरण स्वीकारत नवनवीन मॉडेल्स सादर करण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने गॅलेक्सी ए२०ई आणि ए४० हे दोन नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यात गॅलेक्सी ए२०ई या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१५६० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले इन्फीनिटी व्ही या प्रकारातील असून यावर वॉटरड्रॉप नॉच प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगचा ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८८४ हा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍यांचा ड्युअल सेटअप दिलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. तर फास्ट चार्ज सपोर्टसह यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए४० या मॉडेलमध्ये थोडा मोठा म्हणजे ५.९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात सॅमसंगचाच एक्झीनॉस ७८८५ हा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस १६ आणि ५ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप असून फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सल्सचा आहे. यातील फास्ट चार्जींग सपोर्टयुक्त बॅटरी ३,१०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए२०ई आणि ए४० हे दोन्ही मॉडेल्स लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येतील असे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here