सॅमसंग गॅलेक्सी जे ६ स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा कपात

0
सॅमसंगचा गॅलेक्सी जे ६,सॅमसंग गॅलेक्सी जे ६, samsung galaxy j 6

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी जे ६ या स्मार्टफोनच्या मूल्यात तिसर्‍यांदा कपात करण्याचे जाहीर केले आहे.

सॅमसंग कंपनीच्या गॅलेक्सी जे ६ या स्मार्टफोनला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद लाभला आहे. तथापि, तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या मॉडेलच्या मूल्यात आता तिसर्‍यांदा कपात जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे याचे तीन जीबी रॅमचे व्हेरियंट १०,४९० तर ४ जीबी रॅमचे व्हेरियंट ११,९९० रूपयात आता ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे ६ या मॉडेलमध्ये कंपनीचा ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ७८७० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील, ५.६ इंच आकारमानाचा, एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे गुणोत्तर १८:५:९ इतके आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. याच्याच मदतीने यामध्ये ङ्गफेस अनलॉकफ हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा एक्सपेरियन्स हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यामध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here