सॅमसंगचे एम मालिकेतील दोन स्मार्टफोन सादर

0

सॅमसंग कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी गॅलेक्सी एम १० आणि गॅलेक्सी एम २० हे दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सॅमसंग कंपनी एम ही नवीन मालिका सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. या अनुषंगाने आज गॅलेक्सी एम १० आणि गॅलेक्सी एम २० हे दोन नवीन मॉडेल सादर करण्यात आले. यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे यात व्ही-गार्ड या प्रकारातील फुल व्ह्यू डिस्प्ले दिलेला आहे. यातील गॅलेक्सी एम १० हे मॉडेल २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ७,९९० आणि ८,९९० रूपयात मिळणार आहे. तर गॅलेक्सी एम२० हे मॉडेल ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १०,९९० आणि १२,९९० रूपये इतके असेल. हे दोन्ही मॉडेल्स अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या स्टोअरवरून ५ फेब्रुवारीपासून खरेदी करता येणार आहे. यासोबत रिलायन्स जिओने आपल्या १९८ आणि २९९ रूपयांच्या रिचार्जमध्ये डबल डाटा मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम १० या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा इन्फीनिटी व्ही डिस्प्ले दिलेला आहे. यात एक्झीनॉस ७८३० हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असतील. याच्या मागील बाजूस १३ व ५ मेगापिक्सल्सचा ड्युअल सेटअप दिलेला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एम२० या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा इन्फीनिटी व्ही डिस्प्ले आहे. यात एक्झीनॉस ७९०४ हा प्रोसेसर आहे. याचेही दोन व्हेरियंट असून याचे विवरण वर देण्यात आले आहे. यातदेखील एम १० प्रमाणेच कॅमेरे दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here