सॅमसंगचे दोन नवीन टॅबलेट बाजारपेठेत दाखल

0

सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी गॅलेक्सी टॅब एस५ई आणि गॅलेक्सी टॅब एस १०.१ हे दोन नवीन मॉडेल्स सादर केले आहेत.

सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस५ई या मॉडेलची वाय-फाय आवृत्ती ३५,९९९ रूपये तर वाय-फाय+एलटीई आवृत्ती ३९,९९९ रूपयात मिळणार आहे. तर गॅलेक्सी टॅब एस १०.१ या मॉडेलची वाय-फाय आवृत्ती १४,९९९ तर वाय-फाय+एलटीई आवृत्ती १९,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आलेली आहे. यातील गॅलेक्सी टॅब एस५ई ची वाय-फाय आवृत्ती अमेझॉन इंडियावरून तर वाय-फाय+एलटीई आवृत्ती फ्लिपकार्टवरून मिळणार आहे. तर गॅलेक्सी टॅब १०.१ हे मॉडेल दोन्ही शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

गॅलेक्सी टॅब एस५ई हे मॉडेल अतिशय स्लीम असे आहे. यात १०.५ इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूक्यूएक्सजीए क्षमतेचा व एसमोलेड या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हे डिस्प्ले फुल एचडी प्लस म्हणजे २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा वनयुआय हा युजर इंटरफेस दिलेला आहे. यामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस तंत्रज्ञानाने युक्त असणारी चार स्पीकरची दर्जेदार प्रणाली दिलेली आहे. तर यात फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ७०४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.

दरम्यान, गॅलेक्सी टॅब एस १०.१ या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरा अनुक्रमे ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. तर यातील बॅटरी ६,१५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here