भारतात मिळणार ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त सॅमसंग गॅलेक्सी ए ७०

0

सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असणारा गॅलेक्सी ए ७० हा स्मार्टफोन सादर केला आहे.

सॅमसंगने अलीकडच्या कालखंडात भारतीय बाजारपेठेवर पुन्हा पकड मिळवण्यासाठी लागोपाठ विविध मॉडेल्स सादर करण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने आज भारतीय ग्राहकांसाठी गॅलेक्सी ए ७० हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यात अनेक लक्षवेधी फिचर्स आहेत. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे याच्या मागील बाजूस तीन कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा हा ३२ मेगापिक्सल्सचा आणि एफ/१.७ अपर्चरयुक्त आहे. याला अल्ट्रा वाईड अँगलने युक्त असणारा ८ मेगापिक्सल्स आणि डेप्थ सेन्सरने युक्त असणार्‍या ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी ए७० या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२४०० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा सुपर अमोलेडा या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याच्या वरील बाजूस वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच फास्ट चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा वन युजर इंटरफेस देण्यात आला आहे. व्हाईट, ब्ल्यू आणि ब्लॅक या तीन रंगाच्या पर्यायात याला उपलब्ध करण्यात आलेले आहे. याचे मूल्य २८,९९० रूपये असून याची २० एप्रिलपासून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here