सॅमसंग गॅलेक्सी एस१०, एस१० प्लस व एस१० ई भारतात सादर

0

सॅमसंगने अलीकडेच अनावरण केलेले गॅलेक्सी एस१०, एस१० प्लस व एस१० ई हे उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहे.

येथे उपलब्ध

सॅमसंगने बार्सिलोना शहरात अलीकडेच झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये एस१०, एस१० प्लस व एस१० ई या तीन फ्लॅगशीप मॉडेल्सने अनावरण केले होते. हे उच्च श्रेणीतील मॉडेल्स आता भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे मॉडेल्स फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, टाटा क्लिक व सॅमसंग ई-स्टोअरवरून ऑनलाईन तर देशभरातील निवडक शॉपीजमधून ऑफलाईन या प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहेत.

विविध व्हेरियंटचे मूल्य

यातील गॅलेक्सी एस १० हे मॉडेल ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य ६६,९००) आणि ८ जीबी रॅम+५१२ जीबी स्टोअरेज (मूल्य ८४,९००) या दोन व्हेरियंटमध्ये आणि प्रिझम ब्लॅक, प्रिझम व्हाईट आणि प्रिझम ब्लू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. गॅलेक्सी एस१० प्लस हे मॉडेल ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (मूल्य ७३,९००); ८ जीबी रॅम+५१२ जीबी स्टोअरेज (मूल्य ९१,९००) आणि ८ जीबी रॅम+१ टेराबाईट स्टोअरेज (मूल्य १,१७,९००) अशा पर्यायांमध्ये सिरॅमिक ब्लॅक रंगात तर टॉप व्हेरियंट हे सिरॅमिक व्हाईट रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. गॅलेक्सी एस १०ई हे मॉडेल ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि प्रिझम ब्लॅक व प्रिझम व्हाईट या रंगाच्या पर्यायांमध्ये ५६,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. सॅमसंगने यासोबत काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात एचडीएफसी क्रेडीट अथवा डेबीट कार्डवरून खरेदी करणार्‍याला सहा हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर जुन्या स्मार्टफोनसाठी १५ हजार रूपयांपर्यंतची एक्चचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस १० ई

सॅमसंगने सादर केलेल्या मॉडेल्समधील हे सर्वात किफायतशीर मॉडेल आहे. यात ५.८ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस ( २२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा; १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. सुरक्षेसाठी यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि १६ मेगापिक्सल्सच्या क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १० मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. वायरलेस, रिव्हर्स वायरलेस आणि फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ३१०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यातील विशेष फिचर म्हणजे पॉवर बटनजवळ फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस १०

सॅमसंग एस १० या मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि क्युएसडी ( ३०४० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा; १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. सुरक्षेसाठी यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण आहे. याच्या मागील बाजूस १२, १२ आणि १६ मेगापिक्सल्सच्या क्षमतांचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १० मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. वायरलेस, रिव्हर्स वायरलेस आणि फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. याच्या डिस्प्लेवर अर्थात इन-डिस्प्ले या प्रकारात अल्ट्रासोनीक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. तसेच यात फेस रिकग्नीशन हे फिचरदेखील दिलेले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस १० प्लस

सॅमसंग एस १० प्लस या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि क्युएसडी ( ३०४० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा; १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ६ चे संरक्षक आवरण असणार आहे. यांच्या मागील बाजूस १२, १२ आणि १६ मेगापिक्सल्सच्या क्षमतांचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १० मेगापिक्सल्सचा व ८ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. वायरलेस, रिव्हर्स वायरलेस आणि फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ४१०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. याच्या डिस्प्लेवर अर्थात इन-डिस्प्ले या प्रकारात अल्ट्रासोनीक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. तसेच यात फेस रिकग्नीशन हे फिचरदेखील दिलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here