नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात मिळणार सॅमसंग गॅलेक्सी एम ४० !

0

सॅमसंगने तिहेरी कॅमेर्‍यांनी युक्त असणारा गॅलेक्सी एम ४० हा स्मार्टफोन आता नवीन रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सॅमसंगने जून महिन्यात गॅलेक्सी एम ४० हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला होता. याला प्रारंभी मिडनाईट ब्ल्यू आणि सी वॉटर ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन कॉकटेल ऑरेंज या अतिशय आकर्षक रंगाच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या सुरू असणार्‍या अमेझॉन प्राईम डे सेलमध्ये याला सादर करण्यात आले आहे. याचे ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज हे मॉडेल १९,९९० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. तर एचडीएफसी क्रेडीट वा डेबीट कार्डवरून खरेदी करणार्‍या १० टक्के सवलतदेखील मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ४० या मॉडेलमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ३२ मेगापिक्सल्सचा असून उर्वरित दोन कॅमेरे ८ आणि ५ मेगापिक्सल्सचे आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१३ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि इन्फीनिटी ओ या प्रकारातील डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण आहे. यामध्ये स्क्रीन साऊंड या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे इयरपीसशिवाय ध्वनी ऐकता येणार आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७७५ हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणार असून यावर कंपनीचा वन युआय हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here