नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात मिळणार सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन

0

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ए ३० हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी ए ३० हा स्मार्टफोन ब्ल्यू, लाईट ब्ल्यू आणि रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये भारतीय ग्राहकांना सादर केला होता. आता हेच मॉडेल पांढर्‍या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूल्य १५,४९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३० या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा सुपर अमोलेड, इन्फीनिटी यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये १६ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्यांचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. या स्मार्टफोनमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याला फास्ट चार्जींगचा सपोर्ट आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्यावत आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here