सॅमसंगचे स्वयंचलीत वाहनांसाठी सर्वाधीक पेटंटस्

0

सॅमसंग कंपनीने स्वयंचलीत वाहनांसाठी युरोपात सर्वाधीक पेटंटस् दाखल केले असल्याची माहिती ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे.

युरोपीअन पेटंट कार्यालयाने स्वयंचलीत वाहनांबाबत २०११ ते आजवर नेमके किती आणि कशा प्रकारचे पेटंट दाखल करण्यात आले आहेत याची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. यात संबंधीत कालखंडामध्ये युरोपात ३,९९८ पेटंटस् दाखल झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सॅमसंग कंपनीने सर्वाधीक म्हणजे ६२४ पेटंट सादर केले आहेत. या पाठोपाठ इंटेल या दिग्गज अमेरिकन कंपनीने ५९०; क्वॉलकॉमने ३६१; एलजी इलेक्ट्रॉनिक्सने ३४८ तर बॉश्‍चने ३४३ पेटंट सादर केल्याची माहिती या अहवालातून अधोरेखीत झाली आहे.

वाहकाविना अर्थात स्वयंचलीत पध्दतीत चालणार्‍या वाहनांवर सध्या प्रचंड गतीने संशोधन सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये या वाहनांची गजबजलेल्या रस्त्यांवरून चाचणी घेण्यात येत आहे. तर चीन आणि जपानमध्ये मर्यादीत पध्दतीत का होईना पण रस्त्यावर या प्रकारातील वाहने दिसू लागली आहेत. यामुळे लवकरच जगातील कान्याकोपर्‍यात स्वयंचलीत वाहने दिसू लागल्यास नवल वाटता कामा नये. या पार्श्‍वभूमिवर, सॅमसंगने संबंधीत क्षेत्रात सर्वाधीक पेटंट सादर करण्याची केलेली कामगिरी ही तंत्रज्ञानाच्या विश्‍वात आता चर्चेचा विषय बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here