ओप्पो के १ स्मार्टफोनच्या विक्रीस प्रारंभ

0

ओप्पो कंपनीने अलीकडेच अनावरण केलेल्या के १ या स्मार्टफोनच्या विक्रीस आजपासून प्रारंभ झाला आहे.

ओप्पो के १ हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्यात आला असून हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन व्हान गो ब्ल्यू आणि मोचा रेड या दोन रंगाच्या पर्यायात व १६,९९० रूपये मूल्यात फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबत कंपनीने काही ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. यात प्रामुख्याने सिटीबँक कार्डवरून खरेदी करणार्‍या ग्राहकाला १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. यासोबत नो-कॉस्ट इएमआयची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे.

ओप्पो के १ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यावर वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,६०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कलरओएस ५.२ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here