रिलायन्सचा नवीन धमाका : कुंभ जिओफोन !

0

रिलायन्सने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमिवर कुंभ जिओफोन सेवा सादर केली असून यात या धार्मिक पर्वणीशी संबंधीत घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्येच कुंभमेळ्यास प्रारंभ होत आहे. जवळपास ५५ दिवसांच्या या धार्मिक पर्वणीमध्ये तब्बल १३ कोटींपेक्षा जास्त भाविक पवित्र स्नानाचा लाभ घेणार असल्याचा अंदाज आहे. याचेच औचित्य साधून रिलायन्सने कुंभ जिओफोन ही विशेष सेवा सादर केली आहे. खास करून कुंभमेळ्यातील यात्रेकरूंसाठी यात विविध सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधीत सांगोपांग माहितीसह अनेक रिअल टाईम सेवांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. कुंभ जिओफोनमध्ये खालील महत्वाच्या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.

१) कुंभाविषयी सारे काही !

* कुंभाविषयी सांगोपांग माहिती.
* बस, रेल्वे आदी सेवांबाबतची रिअल टाईम माहिती.
* तिकिट बुकींग आणि ट्रॅकींगची सेवा.
* आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक.
* कुंभमेळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रम आणि मुहूर्तांचे वेळापत्रक.
* स्थानकांवर यात्री आश्रयाची सुविधा.

२) भाविकांसाठी सुविधा

* फॅमिली लोकेटर : यात भाविकांना त्यांच्या कुटुंबियांचे अचूक लोकेशन कळणार आहे.
* खोया-पाया : कुंभमेळ्यात बालके हरविण्याचे प्रमाण मोठे असल्यामुळे यासाठी ही सेवा देण्यात येणार आहे.

३) डिव्होशनल कंटेंट

* कुंभ दर्शन : कुंभमेळ्याच्या कालखंडात जिओटिव्हीवरून याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. यामध्ये आधीच्या कुंभमेळाच्या कार्यक्रमांनाही स्थान मिळणार आहे.
* कुंभ रेडिओ : याच्या माध्यमातून अगदी २४ तास भजन आणि धार्मिक संगीताचा आनंद घेता येईल.

याशिवाय, युजरच्या मनोरंजनासाठी खास गेम्सदेखील सादर करण्यात येणार आहेत. याच्या जोडीला दररोज न्यूज अलर्ट, क्विज आदींची सुविधादेखील मिळणार असल्याचे रिलायन्स जिओतर्फे जाहीर करण्यात आले आहे. कुंभ जिओफोनमधील सेवांचा विद्यमान तसेच नवीन या दोन्ही प्रकारातील युजर्सला लाभ होणार आहे. याला जिओ स्टोअरवरून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here