४८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने सज्ज रेडमी नोट ७ व रेडमी नोट ७ प्रो दाखल

0

शाओमीने तब्बल ४८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने युक्त असणारे रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे दोन स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत सादर केले आहेत.

नवी दिल्लीत झालेल्या लाँचींग कार्यक्रमात शाओमीने आपले विविध प्रॉडक्ट सादर केले. यात सर्वात लक्षवेधी ठरले ते रेडमी ७ आणि रेडमी ७ प्रो हे दोन स्मार्टफोन्स ! शाओमीने आपल्या ख्यातीनुसार यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याच्या मागील बाजूस तब्बल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे. यातील एक कॅमेरा हा सोनीच्या आयएमएक्स५८६ सेन्सरने युक्त असून याची क्षमता ४८ मेगापिक्सल्सची आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून तो प्रतिमेची डेप्थ मापन करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, शाओमीच्या रेडमी नोट ७ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्रामार ग्लास डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १५:५:९ असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरणदेखील देण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यात नॉचयुक्त डिस्प्लेची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याचे ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम +६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट असून यांचे मूल्य अनुक्रमे ९,९९९ आणि ११,९९९ रूपये आहे.

शाओमीच्या रेडमी ७ नोट प्रो या मॉडेलमध्येही वर नमूद केलेले सर्व फिचर्स आहेत. मात्र याची रॅम व स्टोअरेज वाढविण्यात आले आहे. याचे ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय अनुक्रमे १४,९९९ आणि १६,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर आधारित मीयुआय १० या प्रणालीवर चालणारा असून यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीचे रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो हे दोन्ही स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट आणि मी स्टोअरवरून अनुक्रमे ६ आणि १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने नमूद केे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here