रिअलमी एक्स व ३आय स्मार्टफोन्स भारतात सादर

0

रिअलमीने भारतीय ग्राहकांसाठी रिअलमी एक्स आणि रिअलमी ३ आय हे दोन स्मार्टफोन्स सादर केले असून यात अनेक सरस फिचर्स आहेत.

ओप्पोची उपकंपनी असणार्‍या रिअलमीने रिअलमी एक्स आणि रिअलमी ३ आय हे दोन स्मार्टफोन्स आज भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. यातील रिअलमी एक्स हे उच्च श्रेणीतील मॉडेल्स असून रिअलमी ३ आय हे किफायतशीर वर्गवारीतील मॉडेल आहे. रिअलमी एक्स या स्मार्टफोनला ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा पर्यायांमध्ये अनुक्रमे १६,९९९ आणि १९,९९९ रूपये मुल्यात सादर केले आहेत. तर रिअलमी ३ आय हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ७,९९९ आणि ९,९९९ रूपये मुल्यात खरेदी करता येणार आहे.

रिअलमी एक्स

रिअलमी एक्स या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा तसेच १५:५:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ४८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३७६५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर आधारित कलरओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे.

रिअलमी ३ आय

रिअलमी ३ आय या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा, एचडी प्लस क्षमतेचा व १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ पी ६० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर आधारित कलरओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here