रिअलमी ३ सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

ओप्पोच्या मालकीच्या ब्रँड असणार्‍या रिअलमीने आज रिअलमी ३ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे जाहीर केले आहे.

रिअलमीने आजवर सातत्याने किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्याचा अवलंब केला आहे. रिअलमी ३ हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. याला ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ८,९९९ आणि १०,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध करण्याचे घोषीत केले आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या ई-स्टोअरवरून हे दोन्ही व्हेरियंट १२ मार्चपासून खरेदी करता येणार आहे.

रिअलमी ३ या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये मीडियाटेकचा हेलीओ पी ७० हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट आहेत. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असून यात एआययुक्त फेस अनलॉकची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यामध्ये १३ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here