रिअलमी २ प्रो स्मार्टफोनच्या मूल्यात कपात

0
रिअलमी २ प्रो, realme 2 pro

रिअलमी २ प्रो या स्मार्टफोनच्या मूल्यात आता एक हजार रूपयांची कायमस्वरूपी कपात करण्यात आलेली आहे.

ओप्पोची मालकी असणार्‍या रिअलमी ब्रँडचे अनेक मॉडेल्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. यात रिअलमी २ प्रो या मॉडेलचाही समावेश होता. याला भारतीय ग्राहकांसाठी ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य १३,९९०); ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (१५,९९०) आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज (१७,९९०) या तीन व्हेरियंटच्या स्वरूपात लाँच करण्यात आले होते. या सर्व व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपयांनी कपात करण्यात आली आहे. यामुळे हे व्हेरियंट अनुक्रमे १२,९९० आणि १४,९९० रूपये मूल्यात मिळणार आहे. तर ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असणारे टॉप एंड व्हेरियंट सध्या बाजारपेठेत उपलब्ध नाही. तथापि, याचे मूल्यदेखील कमी करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे सर्व व्हेरियंट फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहेत.

रिअलमी २ प्रो या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस २३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा सुपरव्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याच्या वरील भागात वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टॉ-कोअर ६६० प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे तीन व्हेरियंट आहेत. याच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. यात एआय ब्युटिफिकेशन २.०, रिअल टाईम एआर स्टीकर्स, एचडीआर, बोके इफेक्ट आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या प्रणालीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलरओएस ५.२ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

रिअलमी २ प्रो मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here