तब्बल २८ हजारांनी स्वस्त झाला गुगलचा हा स्मार्टफोन

0

गुगलने आपल्या पिक्सल ३ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल २८ हजारांनी कपात करण्याचे जाहीर केले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पिक्सल ३ आणि पिक्सल ३ एक्सएल या मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले होते. यानंतर हे दोन्ही मॉडेल्स भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले होते. यातील पिक्सल ३ एक्सएल हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज (मूल्य ८३,०००) आणि ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज ( मूल्य ९२,०००) अशा दोन पर्यायांमध्ये भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला होता. आता यातील ६४ जीबी स्टोअरेज व्हेरियंटच्या मुल्यात तब्बल २८ हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हा स्मार्टफोन ५४,९९९ रूपयात मिळणार आहे. तर याच्या १२८ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलमध्येही तब्बल २६ हजारांची कपात करण्यात आलेली आहे. यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना ६५,९९९ रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आलेला आहे.

पिक्सेल ३ मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस (२९६० बाय १४४० पिक्सल्स) क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले आहे. याच्या वरील भागात नॉच देण्यात आला असून याचा अस्पेक्ट रेशो १८:५:९ असा आहे. या मध्ये अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली असून यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ जीबी व १२८ जीबींचा पर्याय देण्यात आला आहे. याच्या समोरच्या बाजूस प्रत्येकी ८ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील एकात ७५ तर दुसर्‍यात ९७ अंशाचा व्ह्यू अँगल देण्यात आलेला आहे. तर याच्या मागील बाजूस १२.२ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, ऑटो-फोकस आणि एफ/१.८ अपर्चरचा समावेश आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स वॉटर आणि डस्टप्रूफ आहेत. यामुळे याचा रफ वापर करता येणार आहे. यात ३४३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. या दोन्ही मॉडेल्ससोबत पिक्सल स्टँड हे वायरलेस चार्जरदेखील प्रदान करण्यात आले आहे. हे स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाई या ताज्या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात गुगल असिस्टंट, गुगल डे-ड्रीम, डे-ड्रीम व्हीआर आदींचा सपोर्टदेखील दिलेला आहे. तर यामध्ये फोर-जी व्हिओएलईटीसह एनएफसी, वाय-फाय, गुगल-कास्ट, जीपीएस आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here