१५०० रूपयांनी स्वस्त मिळणार सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन

0

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए ५० या स्मार्टफोनच्या मूल्यात १५०० रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले असून हे मॉडेल फ्लिपकार्ट व अमेझॉनवरून मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए,५० हे मॉडेल ४ जीबी आणि ६ जीबी रॅम या दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १९,९९० आणि २२,९९० रूपये मुल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले होते. आता या दोन्ही व्हेरियंटचे मूल्य १५०० रूपयांनी कमी करण्यात आले आहे. यामुळे आता यांचे मूल्य अनुक्रमे १८,४९० आणि २१,४९० रूपये इतके असणार आहे. ब्लॅक, व्हाईट आणि ब्ल्यू या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टल्सवर उपलब्ध करण्यात आले आहेत.

सॅमसेग गॅलेक्सी ए५० या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा सुपर अमोलेड, इन्फीनिटी यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यातही ऑक्टा-कोअर प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट आहेत. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून यामध्ये अनुक्रमे २५, ८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये २५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातही ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याला फास्ट चार्जींगचा सपोर्ट आहे. तसेच हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्यावत आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here